Sun, Feb 17, 2019 04:58होमपेज › Nashik › नाशिकमध्ये अखिल भारतीय दिव्यांग संमेलन

नाशिकमध्ये अखिल भारतीय दिव्यांग संमेलन

Published On: Mar 22 2018 1:45AM | Last Updated: Mar 22 2018 12:05AMनाशिक : प्रतिनिधी

पुणे येथील साहित्य व सांस्कृतिक मंडळातर्फे येत्या शनिवारी (दि. 24) व रविवारी (दि. 25) सातवे अखिल भारतीय दिव्यांग साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. गंगापूर रोड येथील विश्‍वास लॉन्स येथे होणार्‍या या संमेलनाचे उद्घाटन आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते होणार आहे. 

विश्‍वास बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्‍वास ठाकूर हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. शनिवारी (दि. 24) सकाळी 10 वाजता आ. कडू यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. पंजाब येथील प्रसिद्ध कवयित्री इंदरजित नंदन या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून आमदार हेमंत टकले, महापौर रंजना भानसी, कवी किशोर पाठक उपस्थित राहणार आहेत. यावेळी साहित्य व सांस्कृतिक मंडळाच्या संकेतस्थळाचे प्रकाशन होणार आहे. संमेलनात देशभरातील साहित्यिक सहभागी होत असून, परिसंवाद, कविसंमेलने, साहित्यचर्चा आदी कार्यक्रम होणार आहेत.  

संमेलनातील कार्यक्रम असे...

दि. 24 मार्च : ‘दिव्यांग महिला अभिव्यक्‍तीतील अडथळे व उपाय’ विषयावर परिसंवाद, ‘दिव्यांग व्यक्‍ती अधिकार कायदा 2016’ विषयावर परिसंवाद , कथाकथन : सहभाग : अनंत  ढोले, अनुराग वानरे, नवप्रकाशित साहित्य लेखकाचे मनोगत : सहभाग : रामदास म्हात्रे, मनीष कुमार (दिल्ली), मणी पानसे (पुणे), खुले काव्यवाचन, सांस्कृतिक कार्यक्रम.

दि. 25 मार्च : ‘दिव्यांग व्यक्‍ती, रोजगार व स्वयंरोजगार संधी, आव्हाने, यश-अपयश’ विषयावर परिसंवाद, बहुभाषिक कविसंमेलन (अध्यक्ष : जगन्नाथ चक्रवर्ती), प्रकट मुलाखत : मुरलीकांत पेठकर (पुणे), हंसराज पाटील, भूषण तोष्णीवाल, दिव्यांगांचे समायोजन : जॉन मिल (फ्रान्स), धनंजय भोळे (पुणे), अरुण कुमार (तामिळनाडू), जया राजू (आंध्र प्रदेश), खुले चर्चासत्र : बसवराज पैके, वर्मा तेलंग, सुरेखा ढवळे, रामदास खोत, दत्ता भोसले, आनंदा मोरे, विष्णू वैरागडे, महादेव शिंदे, भगवान कुंवर.

 

Tags ; Nashik , Nashik News,  All India Handycap,Literary Convention,