Wed, Mar 20, 2019 02:35होमपेज › Nashik › एअर डेक्‍कनचे पुन्हा ‘टेकऑफ’

एअर डेक्‍कनचे पुन्हा ‘टेकऑफ’

Published On: Jul 31 2018 1:34AM | Last Updated: Jul 31 2018 12:13AMनाशिक : प्रतिनिधी

बंद पडलेली नाशिक ते मुंबई आणि पुणे विमानसेवा एअर डेक्‍कनने पुन्हा सुरू केली आहे. ‘सिम्पलीफ्लाय’ या टॅगलाइनअंतर्गत रविवारपासून (दि.29) ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिककरांना एकदा विमानाने अवघ्या 40 मिनिटांमध्ये मुंबई, पुणे गाठणे शक्य होणार आहे. 

केंद्र सरकारच्या उडान योजनेंंतर्गत एअर डेक्कनकडून सुमारे सव्वा महिन्याच्या खंडानंतर पुन्हा एकदा या सेवा सुरू करण्यात येत आहे. ओझर येथून रविवारी (दि.29) सकाळी 8.30 वाजता विमानाने मुंबईसाठी पहिले टेकऑफ घेतले. मुंबईत हे विमान 9 वाजून 20 मिनिटांनी लॅण्ड झाले. दरम्यान, परतीच्या प्रवासात सायंकाळी 4.55 वाजता नाशिकसाठी विमान टेकऑफ घेणार असून, नाशिकला ते पावणेसहा वाजता पोहोचले. दरम्यान, मुंबईप्रमाणेच पुण्यासाठीची सेवाही एअर डेक्‍कनने सुरू केली आहे. दर सोमवारी मात्र, दोन्ही मार्गावरील सेवा बंद असणार आहे. 

एअर डेक्‍कनने सुरू केलेली सेवा ही मंगळवार ते रविवार अशी सलग सहा दिवस असणार आहे. यामध्ये मंगळवार, बुधवार तसेच रविवारी सकाळी 8.30 वाजता मुंबईचे विमान टेकऑफ घेईल. तर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस हे विमान सकाळी 11 वाजता असणार आहे.