Wed, Mar 20, 2019 22:53होमपेज › Nashik › खोटे गुन्हे मागे घ्या.. अन्यथा आक्रमक आंदोलने करु

खोटे गुन्हे मागे घ्या.. अन्यथा आक्रमक आंदोलने करु

Published On: May 28 2018 7:24PM | Last Updated: May 28 2018 7:24PMसातपूर : पुढारी ऑनलाईन

सिआयटू युनियनचे राज्य अध्यक्ष डॉ.डी.एल.कराड यांच्याविरुध्द दाखल केलेल्‍या गुन्ह्याचे पडसाद नाशिक जिल्ह्या पुरते मर्यादीत न राहता राज्यभर उमटणार असल्याचे संकेत मिळत आहेत.  यासाठी येत्या ६ जूनला सिटूच्यावतीने राज्यभरात आक्रमक आंदोलने करण्यात येणार असल्याची माहिती सिटूचे राज्य सरचिटणिस एम. एच. शेख यांनी दिली.  दरम्यान, मंगळवारी जिल्ह्यातील हजारो कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनाला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी आमदार जे.पी. गावीत यांच्यासह राज्य कमिटीच्या वतीने पोलिस आयुक्त रविंद्रकुमार सिंघल यांना निवेदन देण्यात आले.

सातपूर औद्योगिक वसाहतीतील सिअर्स कंपनीतील कामगारास मारहाण करणाऱ्या चौघा संशयित कामगारांसह सिटू युनियनचे राज्य अध्यक्ष डॉ. कराड यांच्यावर सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याविरोधात सिटूच्या राज्य कमिटीची बैठक खुटवडनगर येथील सिटू भवनात पार पडली. यावेळी सिटूचे उपाध्यक्ष सहीद अहमद, उध्दव भवळकर, खजिनदार के.आर.रघु, राष्ट्रीय सदस्य विवेक मॉन्टेरो, सचिव धर्मा कांबळे, जिल्हा अध्यक्ष सिताराम ठोंबरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. नाशिकमध्ये कामगार संपाद्वारे विविध ठिकाणी निदर्षने, मोर्चा, धरणे, रास्ता रोको, घेराव अशा विविध प्रकारच्या आंदोलनातून सरकारचा व भांडवलदारांचा निषेध नोंदवणार असल्याची माहीती शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोमवार दि. २८ रोजी आमदार जे. पी. गावीत यांच्यासह राज्य कमिटीच्या वतीने पोलिस आयुक्त रविंद्रकुमार सिंघल यांना यावेळी निवेदन देण्यात आले. 

आरोग्य विज्ञानविद्यापीठ विरोधात सिटूचे आंदोलन सुरु आहे. या खात्याचे मंत्री नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन आहेत. १ मे कामगार दिनाच्या दिवशी कामगारांनी पालकमंञ्यांना घेराव घालत जाब विचारण्याचा प्रयत्न केला होता. तो राग मनात ठेवून पोलिस प्रशासनाला हाताशी धरत हा गुन्हा नोंदवला गेला आहे. 


एम. एच. शेखसिटू राज्य सरचिटणिस