Thu, Jul 18, 2019 06:05होमपेज › Nashik › महिलेच्या मृत्यूनंतर संतप्‍त जमाव रस्त्यावर

महिलेच्या मृत्यूनंतर संतप्‍त जमाव रस्त्यावर

Published On: Jun 01 2018 12:23PM | Last Updated: May 31 2018 10:47PMनाशिकरोड : वार्ताहर 

नाशिक-पुणे महामार्गावरील पळसे गाव येथे गुरुवारी (दि.31) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ट्रक आणि दुचाकीच्या अपघातामध्ये महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली. यावेळी संतप्त गावकर्‍यांनी रास्ता रोको केल्याने बराचवेळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. 

गुरुवारी सायंकाळी सिमेंटची वाहतूक करणारा ट्रक नाशिकरोडच्या दिशेने येत असताना नाशिकरोडकडून पळसे गावाच्या दिशेने दुचाकीवरून जात असलेल्या जोडप्याला ट्रकने धडक दिली. या अपघातात दुचाकी ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाली. या अपघातातील मृत व जखमीचे नाव समजू शकले नाही. अपघातानंतर नागरिकांनी तात्काळ मदत कार्य करत रस्त्यावरच आंदोलन सुरु केले. यावेळी नागरिकांनी संतप्त भावना व्यक्‍त करीत रास्ता रोखून धरल्याने काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली. यावेळी संतप्त नागरिकांनी जेसीबी मशीनच्या साहायाने नाशिक-पुणे महामार्गावर खोदकाम करून गतिरोधक तयार केला.

तर नागरिकांच्या भावना आणि प्रकरण अतिशय संवेदनशील असल्याचे पाहून पोलिसांनीदेखील संयमाची भूमिका घेत तणाव दूर करण्यासाठी प्रयत्न केले. रात्री उशिरापर्यंत वातावरण तणावपूर्ण होते. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी वारंवार मागणी करूनदेखील पळसे गावाजवळ गतिरोधक करण्यात न आल्यानेच हा अपघात झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.