Wed, Jul 17, 2019 18:01होमपेज › Nashik › अखेर 26 महिन्यांनंतर भुजबळ फार्म गजबजले

अखेर 26 महिन्यांनंतर भुजबळ फार्म गजबजले

Published On: May 05 2018 12:51AM | Last Updated: May 04 2018 11:28PMसिडको : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व नाशिक जिल्ह्याचे विकासपुरुष छगनराव भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्याची वार्ता नाशकात आली. त्यानंतर सिडकोतील त्यांचे निवासस्थान असलेल्या भुजबळ फार्म येथे समर्थकांनी फटाके फोडून, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. 26 महिन्यांनंतर भुजबळ फार्म पुन्हा गजबजलेले दिसले. भुजबळ फार्म येथे दुपारी 3 वाजेनंतर कार्यकर्ते व समर्थक जमू लागले. जसजशी माहिती कार्यकर्ते तसेच समर्थकांनाच समजली तसे कार्यकर्ते भुजबळ फार्मवर गर्दी करू लागले. यानंतर समर्थकांनी फटाके फोडून ढोल-ताशांच्या गजरावर नाचून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, प्रकाश वडजे, संतोष कमोद, योगेश कमोद, अमर वझरे, मोहन माळी, उदय जाधव, बाळासाहेब कर्डक, मुकतार शेख, छबू नागरे, नाना पवार, मधुकर जेजुरकर, भालचंद्र भुजबळ आदींसह कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव  साजरा केला.

Tags : Nashik, 26, months, Bhujbal, home, started, fluttering