Tue, Jan 22, 2019 12:30होमपेज › Nashik › वकिलांनी केली फी दरवाढ निर्णयाची होळी 

वकिलांनी केली फी दरवाढ निर्णयाची होळी 

Published On: Jan 25 2018 1:29PM | Last Updated: Jan 25 2018 1:29PMनाशिक : प्रतिनिधी 

शासनाने कोर्ट फीमध्ये भरमसाठ वाढ केल्याचा निषेध करत नाशिक बार असोसिएशनने गुरुवारी (दि.25) न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर या निर्णयाची होळी केली. दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करत जिल्हाधिकार्‍यांना निवदेन देण्यात आले. वकिलांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांनी पाठिंबा दिला आहे. 

दरवाढ मागे  न घेतल्यास विधीमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करुन सर्वसामान्यांना न्याया मिळवून देऊ, असे आमदार जयंत जाधव यांनी सांगितले.