Tue, Apr 23, 2019 18:05होमपेज › Nashik › आदित्य ठाकरे आजपासून दोन दिवस जिल्हा दौर्‍यावर

आदित्य ठाकरे आजपासून दोन दिवस जिल्हा दौर्‍यावर

Published On: Aug 24 2018 12:46AM | Last Updated: Aug 23 2018 11:21PMनाशिक : प्रतिनिधी

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे शुक्रवार (दि.24)पासून दोन दिवस नाशिक जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. ठाकरे त्यांच्या उपस्थितीत मालेगाव, नांदगाव, पिंपळगाव-बसवंत, भगूर, पांढुर्ली, घोटी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेबचौधरी यांनी दिली. 

सकाळी 9.30 वाजता मालेगाव येथे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे आणि युवासेना विस्तारक आविष्कार भुसे यांनी आयोजित केलेल्या मोफत दाखले वाटप व आरोग्य शिबिरास ठाकरे उपस्थित राहणार आहेत. दुपारी 2 वाजता नांदगाव येथे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिर व सेल्फ डिफेन्स कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत. सायंकाळी 4 वाजता पिंपळगाव बसवंत येथे सेल्फ डिफेन्स व आरोग्य शिबिरात उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, तालुकाप्रमुख सुधीर कराड आदींची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

सायंकाळी 5 वाजता दिंडोरीतील मोहाडी सह्याद्री अ‍ॅग्रोला ठाकरे भेट देणार आहेत.  शनिवारी सकाळी 10 वाजता सिडको येथील महाआरोग्य शिबिराचे ठाकरे उद्घाटन करणार आहेत. शिबिराचे आयोजन प्रभाग सभापती हर्षा बडगुजर, नगरसेवक सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे यांनी केले आहे. 10.30 वाजता नगरसेवक तथा युवासेना जिल्हा अध्यक्ष दीपक दातीर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते  होणार आहे.

गंगापूर रोडवरील श्रद्धा लॉन्स येथे 11.30 वाजता सेल्फ डिफेन्स कार्यक्रमात ठाकरे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. दुपारी 2 वाजता खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या प्रयत्नातून साकारणार्‍या भगूर बसस्थानकाचे भूमिपूजन ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. 3 वाजता पांढुर्ली येथे टेलिमेडिसीनचा शुभारंभ तर 4.30 वाजता घोटीला शिवसेना संपर्क कार्यालय उद्घाटन कार्यक्रमास ठाकरे हजेरी लावणार आहेत.

यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, जि.प अध्यक्षा शीतल सांगळे, उपनेते बबन घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे, अनिल कदम, योगेश घोलप, वरुण सरदेसाई, जय सरपोतदार, अमित पाटील रंजना नेवाळकर,  स्नेहल मांडे, सत्यभामा गाडेकर, अजय बोरस्ते, विलास शिंदे, सचिन मराठे, महेश बडवे, विनायक पांडे, राहुल ताजनपुरे, दत्ता गायकवाड, जयंत दिंडे आदी उपस्थित राहणार आहेत.