Mon, May 20, 2019 18:04होमपेज › Nashik › आयुक्त मुंडेंनी पदाधिकार्‍यांकडील जादा कर्मचारी काढून घेतले 

आयुक्त मुंडेंनी पदाधिकार्‍यांकडील जादा कर्मचारी काढून घेतले 

Published On: Feb 13 2018 6:54PM | Last Updated: Feb 13 2018 6:53PMनाशिक : प्रतिनिधी

कार्यभार स्‍वीकारल्‍यापासून अवघ्या पाचच दिवसात अधिकारी कर्मचार्‍यांना पळता भूई थोडी करणार्‍या आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा पदाधिकार्‍यांकडे वळविला आहे. पदाधिकार्‍यांकडे अधिक असणारे कर्मचारी काढून घेत त्यांना त्यांच्या मुळ जागी पदस्थापना दिली जाणार आहे. यामुळे पदाधिकार्‍यांचा रोष
वाढणार असून, वशिला लावून सोयीच्या ठिकाणी बसलेल्या कर्मचार्‍यांनाही आता नरमाईनेच घ्यावे लागणार आहे.

महापालिकेतील देव देवतांच्या फोटो काढून घेण्याबरोबरब कामावर येताना गणवेश कसा असावा याबाबत आयुक्त मुंढे यांनी आल्या आल्याच शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे मुंढे यांनी नाशिकमध्ये कामकाज सुरू करतानाच वाद सुरू झाला आहे. कार्यालयातील देव देवतांच्या प्रतिमा काढून घेण्याचे आदेश दिल्याने कर्मचार्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेत कर्माचार्‍यांचे संख्याबळ खूपच अपुरे आहे. त्यात खातेप्रमूख आणि एक-एका पदाधिकार्‍यांकडे कामकाजासाठी चार ते पाच लिपीक आणि तीन ते चार शिपाई आहेत. यातील अनेक कर्मचार्‍यांची मूळ नियुक्ती बिगारी, सफाई कर्मचारी अशा स्वरुपाची आहे. मात्र, बहुतांश कर्मचारी हे वशिलेबाजीने कामाच्या सोयीनुसार पदाधिकार्‍यांकडे काम करत आहेत. यामुळे साहजिकच इतर कर्मचार्‍यांवर त्याचा ताण निर्माण होत असल्याने हीच बाब ओळखून मुंढे यांनी पदाधिकार्‍यांकडील काही कर्मचार्‍यांना त्यांच्या मुळ जागेवर रवानगी करण्याचा निर्णय घेतला आहे.

तुकाराम मुंढे यांनी गोदाघाटचा पाहणी दौरा करत असताना तेथील अस्वच्छता पाहून स्वच्छता निरीक्षकासह आरोग्य अधिकार्‍यांना काम करण्याची इच्छा आहे की नाही असा प्रश्‍न करत कानउघाडणी केली. गंगाघाटावर वाळूचे ठिय्ये बघून अवैध वाळू जप्त करण्याचे आदेश दिले. घाटावर मंदिरे किती असे अधिकार्‍यांना विचारले असता अधिकारी निरूत्तर झाले. पाहणी दौर्‍यात मनपा अधिकार्‍यांचा संपूर्ण जथाच होता. यावेळी त्यांनी स्मार्ट सिटी आणि गोदापार्क सुशोभिकरण कारण्यासाठी सल्लागार म्हणून काम करणार्‍या क्रिसील कंपनीच्या प्रतिनिधींकडून नकाशाद्वारे माहिती जाणून घेतली.