Sat, Jul 20, 2019 10:39होमपेज › Nashik › प्रदूषणकारी कारखान्यांवर कारवाई

प्रदूषणकारी कारखान्यांवर कारवाई

Published On: Apr 27 2018 12:58AM | Last Updated: Apr 26 2018 11:03PMनाशिक : प्रतिनिधी

नंदिनी नदीची हद्द निश्‍चित करण्याबरोबरच नाले आणि गोदावरीसह उपनद्यात सांडपाणी सोडणार्‍या कंपन्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश मनपा, जलसंपदा व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला विभागीय आयुक्‍त राजाराम माने यांनी दिले आहेत. 

गोदावरी आणि उपनद्यांमधील प्रदुषणसंदर्भात दाखल याचिकेनुसार न्यायालयाने विभागीय आयुक्‍तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीने गेल्या आठवड्यात बैठक घेऊन मनपासह प्रदूषण नियंत्रण मंडळ व जलसंपदा तसेच एमआयडीसीला विविध सूचना केलया होत्या. त्यानुसार माने यांनी गुरूवारी सोमेश्‍वर ते दसक पंचक पर्यंत विविध ठिकाणांची पाहणी केली. सोमेश्‍वर येथे निरीने तयार केलेल्या नाल्याच्या पाण्यावर प्रक्रिया करणार्‍या प्रकल्पाची पाहणी त्यांनी केली. सातपूर एमआयडीसीतील एका चेंबरमध्ये काही कंपन्यांनी मिळून तयार केलेल्या एका चेंबरमध्ये प्रदुषित पाणी सोडले जात असल्याची बाब पाहणीत निदर्शनास आली. त्यावर विभागीय आयुक्‍तांनी संबंधित विभागांची झाडाझडती घेत ताबडतोब संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याचे आदेश. यानंतर त्यांनी गोदावरी पात्राची पाहणी केली. तेथील अतिकमणांविषयी त्यांनी मनपा प्रशासनाला विचारणा केली. सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देत स्वत:च काही ठिकाणांची छायाचित्रे काढली.

टाळकुटेश्‍वर येथून तपोवन येथील एसटीपीची पाहणी केली. आणि त्यानंतर दसक पंचक येथील घाट आणि आगरटाकळी येथील एसटीपीची पाहणी केली. एसटीपीतून बाहेर पडणार्‍या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया होत नसल्याचे निदर्शनास आले. नंदिनी नदीचीही पाहणी त्यांनी केली. नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर भराव पडत असल्याने या नदीचे पात्र लहान होत असल्याने  हद्द निश्‍चित करण्याचे आदेश जलसंपदा व महापालिकेला दिले. दौर्‍यात राजेश पंडित, निशिकांत पगारे, मनपाचे कार्यकारी अभियंता संजय घुगे, उच्च न्यायालय गठीत समितीचे सचिव रघुनंदन गावडे, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे पाटील आदी उपस्थित होते. 

Tags : Nashik, nashik news, polluting, factories, Action,