Wed, Mar 20, 2019 02:44होमपेज › Nashik › रेडिअम रिफ्लेक्टर नसणार्‍या वाहनांवर १५ फेब्रुवारीनंतर कारवाई

रेडिअम रिफ्लेक्टर नसणार्‍या वाहनांवर १५ फेब्रुवारीनंतर कारवाई

Published On: Jan 20 2018 1:40AM | Last Updated: Jan 19 2018 11:50PMमालेगाव : प्रतिनिधी

रस्त्यांवर रात्रीच्या वेळी होणार्‍या अपघातांमध्ये होणार्‍या जीवितहानीच्या दुर्घटना रोखण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहनांना परावर्तक पट्ट्या ( रिफ्लेक्टर) बसविण्यासाठी मोहिम हाती घतली आहे. दि. 15 फेब्रवारीनंतर रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे.

आरटीओ कार्यालयाने ट्रॅक्टर ट्रॉली, बैलगाड्या व ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम राबवत आहे. शेती कामातील ट्रेलर उत्पादकांची बैठक घेऊन त्यांना सुरक्षेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतीकामाच्या हायड्रॉलिक ब्रेकच्या तरतुदींमुळे केंद्र सरकारच्या या तरतुदीत सूट देण्यात आली. सुमारे एक वर्षापासून बंद असलेल्या ट्रेलर नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

वाहन नोंदणी करताना जी. एस.टी. बिल आवश्यक आहे. त्यामुळे ट्रॅक्टर व ट्रेलर या प्रकारातील सर्व उत्पादक व वितरकांनी नोंदणीची प्रक्रिया 15 फेब्रुवारी 2018 पर्यंत पूर्ण करावी.या  नोंदणीची प्रक्रिया सुलभ असून वाहनधारकांनी आपल्या वितरकांकडे यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी केले आहे.

ग्रामीण भागात शेती मालाचे ट्रॅक्टर, ट्रेलर व बैलगाड्यांना परावर्तक पट्टी नसल्यामुळे अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवर सुरक्षिततेसाठी खड 090-2005 मानांकनाचे 2 सेमी जाडीचे रेडिअम रिफ्लेक्टिव्ह टेप समोरील बाजूस पांघर्‍या रंगाचे, मागील बाजूस लाल रंगाचे लावावेत. पुढील बाजूला पांढरे आणि मागील बाजूस लाल रेडिअम रिफ्लेक्टिव्ह टेप डाव्या व उजव्या कोपर्‍यात लावावे ते 28.5 चौसेमी  पेक्षा कमी नसावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.