Mon, Feb 18, 2019 05:27होमपेज › Nashik › नाशिक : उघड्यावर मास विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई

नाशिक : उघड्यावर मास विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातपूर (नाशिक) : वार्ताहर 

सातपूर येथील परिसरात अनधिकृतपणे उघड्यावर मास विक्री करणाऱ्या मास, मटण,चिकन,मच्छी विक्रेत्यांवर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज सोमवार (दि.2 एप्रिल) कारवाई केली. या कारवाईत २०० किलो मास तसेच विक्रेत्यांचे साहित्य ताब्यात घेण्यात आले. पालिकेच्या या कारवाईमुळे मास विक्रेत्यांमध्ये गोंधळ उडाला. 

शहरासह सातपूर परिसरात उघड्यावर मास विक्री करण्यास बंदी असताना मांस विक्री केली जात होती. याबाबत पालिका सभागृह नेते दिनकर पाटील यांनी अनेकदा प्रश्न उपस्थित केला होता. तर वेळोवेळी यासंबंधी कारवाईसाठी निवेदनही दिले होते.  उघड्यावर मास विक्री करण्यास पालिकेची बंदी असताना देखील सर्रास मास विक्री होत होती. यामुळे शहरांची प्रतिमा डागाळलेली. 

याबाबत आयुक्तांच्या आदेशानुसार  विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाईत आयटीआय, कार्बननाका, अशोकनगर, श्रमिक नगर, सातपूर-अंबड लिंक रोड, संजीव नगर परिसरातील उघड्यावर मास विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.
 

Tags : nashik, nashik news,  Meat Sellers, Action,


  •