Mon, Apr 22, 2019 04:02होमपेज › Nashik › कोटंबी घाटात अपघात : ट्रक चक्‍काचूर; दोन जखमी

कोटंबी घाटात अपघात : ट्रक चक्‍काचूर; दोन जखमी

Published On: Jan 29 2018 1:31AM | Last Updated: Jan 28 2018 10:28PMपेठ : वार्ताहर

गुजरात राज्यातून हैदराबाद येथे जाणारा मालवाहू ट्रक पेठ-नाशिक रस्त्यावरील कोटंबी घाटात एका अवघड वळणावर उलटून झालेल्या अपघातात ट्रक चक्काचूर झाला. यात दोन जण जखमी झाले आहेत.

वापीहून हैदराबाद येथे जाणारा मालवाहू बारा चाकी ट्रक (के.ए.56 0745) पहाटे दोन वाजेच्या सुमारास पेठ-नाशिक रस्त्यावरील कोटंबी घाटात उलटला. एका अवघड वळणावर चालकाचा अंदाज चूकल्याने ट्रक खाली गेला. या अपघातात ट्रकचा चक्काचूर झाला असून चालक जगन्‍नाथ साहेबाना दुट्टीकोडा (35) व वाहक राजू नागाप्पा वालीकन (38) हे जखमी झाले. अपघाताची माहिती समजताच पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंंचनामा करून पहाटे जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविले.