Thu, Jan 17, 2019 17:38होमपेज › Nashik › आम आदमी पार्टीचे वेश्यावस्तीत रक्षाबंधन 

आम आदमी पार्टीचे वेश्यावस्तीत रक्षाबंधन 

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 26 2018 11:19PMउपनगर : वार्ताहर 

वेश्याव्यवसाय करणार्‍या भगिनींबरोबर आम आदमी पार्टीतर्फे रक्षाबंधन साजरे करण्यात आले. नाशिकच्या भद्रकाली येथील वेश्या वस्तीत जाऊन त्यांच्याकडून आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राख्या बांधून घेतल्या.

समाजातील इतर महिलांसाठी या महिलांनी एकप्रकारे बलिदानच दिलेले आहे. या दुर्लक्षित घटकाला समाजाने वाळीत टाकून दिलेले आहे. या घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून सन्मानाची वागणूक मिळावी, या उद्देशाने आम आदमी पार्टीच्या वतीने वेश्याव्यवसाय करणार्‍या महिलांच्या घरात जाऊन त्यांच्याकडून राखी बांधून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. मुक्ता या स्वयंसेवी संस्थेने आपच्या या उपक्रमाला मदत केली. यावेळी महिलांना पेढे, पाण्याच्या बाटल्या वाटण्यात आल्या. यावेळी महिलांनी आपचे कार्यकर्ते येणार म्हणून जय्यत तयारी करून ठेवली होती. महिलांनी कार्यकर्त्यांना घरात बोलावून त्यांचे औक्षण करून त्यांना राख्या बांधल्या. या उपक्रमामुळे वेश्या वस्तीतील महिला भारावून गेल्या होत्या. त्यांनी आम आदमीच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देऊन त्यांचे आभार मानले. यावेळी ‘आप’चे प्रदेश प्रवक्ते जितेंद्र भावे, जगबीर सिंग, अभिजीत गोसावी, मिलिंद पगारे आदी उपस्थित होते.