Thu, Jun 20, 2019 04:36होमपेज › Nashik › नाशिक : खर्डी येथे महामार्गावर गॅस टँकर पलटी

नाशिक : खर्डी येथे महामार्गावर गॅस टँकर पलटी

Published On: May 21 2019 9:42PM | Last Updated: May 21 2019 9:42PM
इगतपुरी : वार्ताहर

मुंबई आग्रा महामार्गावरील खर्डी गावाजवळ गॅस टँकर पलटी होऊन गॅस गळती झाली. या गॅस गळतीमुळे या मार्गावरील वाहतुक बंद केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. ही घटना आज, मंगळवार (दि.२१) सायंकाळच्या सुमारास घटली. सुदैवाने या गॅस गळतीत कोणतीही वाईट घटना घडली नाही.

या गॅस गळतीमुळे पर्यायी कच्या रस्त्याने ही वाहतुक वळविण्यात आल्याने अतिशय संथ गतीने वाहतूक सुरु होती. यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

मुंबई महामार्गावरील खर्डी येथे एचपी कंपनीचा गॅस टँकर पलटी झाला. यामुळे यामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र पिक इन्फ्रा कर्मचारी व पोलिसांच्या साहाय्याने येथील वाहतूक पर्यायी कच्च्या रस्त्याने वळविण्यात आली आहे. तर या गॅस टँकरला छोट्या प्रमाणात गॅस गळती लागल्यामुळे मुंबई येथून जम्बो ट्रेलर मागवण्यात येणार आहे. तसेच घटनास्थळी एचपी कंपनीचे कर्मचारी दाखल झाले. मात्र मुंबईकडून नाशिककडे येणाऱ्या व मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा रांगा लागलेल्या होत्या. पूर्ण वाहतूक सुरळीत होण्यास मध्यरात्र लागण्याची शक्यता आहे.