Fri, May 24, 2019 06:55होमपेज › Nashik › घाना येथील शिष्टमंडळाने जाणून घेतली औद्योगिक क्षेत्राची माहिती

घाना येथील शिष्टमंडळाने जाणून घेतली औद्योगिक क्षेत्राची माहिती

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातपूर :  आफ्रिकेतील घाना या देशातील ‘घाना-इंडिया बिझनेस डेव्हलपमेंट सेंटर’चे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर टेडी गुह, सदस्य फेलिस लार्टी, अलाईस अड्डो यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (दि. 29 मार्च) सातपूर येथील निमा कार्यालयास भेट देत नाशिक औद्योगिक क्षेत्राविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी निमातर्फे अध्यक्ष मंगेश पाटणकर, उपाध्यक्ष उदय खरोटे, सचिव ज्ञानेश्‍वर गोपाळे, नितीन वागस्कर, गौरव धारकर, नीरज बदलानी, अलियावर इनामदार, टाइम कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुमित तिवारी आदींची उपस्थिती होती. 

यावेळी पाटणकर यांनी नाशिकमध्ये औद्योगिक गुंतवणुकीसाठी असलेल्या अनुकूल बाबी स्पष्ट केल्या. नाशिकमध्ये विविध क्षेत्रांत असलेल्या सुविधा, ‘मेक इन नाशिक’च्या रुपाने औद्योगिक गुंतवणूक यावी यासाठी निमातर्फे सुरु असलेले प्रयत्न, निमातर्फे 3, 4 व 5 मे 2018 रोजी आयोजित होत असलेले ‘निमा इंडेक्स 2018’ हे औद्योगिक प्रदर्शन या बाबी घाना शिष्टमंडळासमोर मांडण्यात आल्या. नाशिकमधील क्षमतांबद्दल माहिती देणारी चित्रफितदेखील यावेळी सादर करण्यात आली. शिष्टमंडळाने घानातील औद्योगिक क्षेत्र, विविध क्षेत्रास असलेला वाव, घाना शासनाचे औद्योगिक धोरण या बाबींची माहिती देण्यात आली. 

भविष्यात उभय देशांतीत संभाव्य सामंजस्य करार, औद्योेगिक क्षेत्रातील माहितीचे आदानप्रदान व उद्योजकांस विस्तारासाठी असलेल्या संधी याबाबतीत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी घाना शिष्टमंडळाद्वारे घानातील औद्योगिक गुंतवणुकीच्या संधींबाबत माहिती देणारी चित्रफित सादर करण्यात आली. निमा पदाधिकार्‍यांनी घाना देशास भेट द्यावी, याबाबत आमंत्रित करण्यात आले. तर घानाच्या शिष्टमंडळाने ‘निमा इंडेक्स 2018’ या औद्योगिक प्रदर्शनास भेट द्यावी, यासाठी निमातर्फे आमंत्रित करण्यात आले.

Tags : Nashik, Nashik News, delegation, Ghana, learned, industrial, sector, information


  •