Wed, Mar 27, 2019 06:01होमपेज › Nashik › नऊ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्‍त 

नऊ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्‍त 

Published On: Aug 20 2018 1:38AM | Last Updated: Aug 19 2018 10:28PMनाशिक : प्रतिनिधी

सुरगाणा तालुक्यातील वनविभागाच्या चिचपाडा चेकनाक्यावर स्विफ्ट व सॅन्ट्रो कारमधून सुमारे नऊ लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्‍त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कळवण पथकाने ही कारवाई केली. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्‍त प्रसाद सुर्वे, जिल्हा अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण विभागाच्या पथकाने सुरगाणा तालुक्यातील चिचपाडा येथे नाकाबंदी केली. त्यावेळी सोमवारी (दि.13) दुपारच्या सुमारास स्विफ्ट कार व सॅन्ट्रो कारमधून दमन राज्यातील विदेशी मद्यसाठा महाराष्ट्रात अवैधरीत्या विक्रीसाठी आणला जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे पथकाने दोन्ही कारसह आठ लाख 84 हजार 800 रुपयांचा मद्यसाठा जप्‍त केला. या कारवाईत दोघा संशयितांनाही अटक करण्यात आली आहे. कळवण विभागाचे निरीक्षक आर. एस. सोनवणे, दुय्यम निरीक्षक डी. डी. चौरे, जे. बी. चव्हाणके, पंडित जाधव, संतोष कडलग, अवधूत पाटील, पांडुरंग वाईकर, गणेश शेवगे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.