Mon, Sep 24, 2018 13:53होमपेज › Nashik › समृद्धीसाठी 72 टक्के जमीन अधिग्रहण

समृद्धीसाठी 72 टक्के जमीन अधिग्रहण

Published On: Jun 13 2018 1:34AM | Last Updated: Jun 12 2018 11:38PMनाशिक : प्रतिनिधी

समृद्धी प्रकल्पासाठीच्या जमिनी अधिग्रहणासाठी वेग आला असून, जिल्ह्यात आतापर्यंत खासगी व शासकीय मिळून एकूण 800 हेक्टर म्हणजेच 72.21 टक्के जमीन अधिग्रहण पूर्ण झाले आहे. दरम्यान, जमीन अधिग्रहणासाठी प्रशासनाने प्राथमिक अधिसूचना जारी केली आहे. 

702 किलोमीटरच्या मुंबई-नागपूर समृद्धी प्रकल्पासाठी सिन्नर व इगतपुरी तालुक्यांतील जमिनी अधिग्रहीत केल्या जात आहेत. सिन्नर तालुक्यात 523.70 हेक्टर तर इगतपुरीत 383.18 हेक्टर क्षेत्र आतापर्यंत अधिग्रहीत केले. दोन्ही तालुक्यांतील चार हजार 747 शेतकर्‍यांनी प्रकल्पासाठी जमीन दिली आहे संबंधित शेतकर्‍यांना जमीन अधिग्रहणापोटी नुकसानभरपाई म्हणून प्रशासनाने 861 कोटी 56 लाख 83 हजार 470 रुपये वाटप केले. दरम्यान, जिल्ह्यात एकूण 1280 हेक्टर क्षेत्र अधिग्रहीत करायचे आहे

राज्य सरकारने प्रकल्पाच्या उभारणीसाठी 10 जिल्ह्यांमध्ये 13 विभाग केले आहेत. त्यात नाशिक व नगरचे काम दोन कंपन्यांना देण्यात आले आहे. दरम्यान, जुलैच्या पहिल्या आठवड्यात कामाचे भूमिपूजन करण्याचा सरकारचा मानस आहे. सरकारने सक्तीने भूसंपादनाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार इगतपुरी व सिन्नरमधील अधिग्रहण बाकी असलेल्या गटाची प्राथमिक अधिसूचना प्रशासनाने गत महिन्याच्या 30 तारखेला प्रसिद्ध केली. 21 दिवसांच्या हरकती या सूचनेवर मागविण्यात आल्या आहेत. दरम्यान, येत्या 20 तारखेच्या आसपास अंतिम अधिसूचना प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. अंतिम सूचना प्रसिद्ध होण्यापूर्वी अनेक शेतकर्‍यांनी जमिनीचे अधिग्रहण करण्यासाठी संमती देत असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे.