Tue, Jun 25, 2019 21:39होमपेज › Nashik › मनपात ठेकेदारीवर भरणार ७०० सफाई कर्मचारी

मनपात ठेकेदारीवर भरणार ७०० सफाई कर्मचारी

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 09 2018 11:42PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

शहर स्वच्छतेची कामे करण्यासाठी 700 सफाई कर्मचार्‍यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. त्या संदर्भातील प्रस्ताव प्रशासनाने तयार करून तो महासभेत मंजुरीसाठी सादर केला असून, या भरतीसाठी वर्षाकाठी 20 कोटी 70 लाख रुपयांचा बोजा मनपाच्या तिजोरीवर पडणार आहे. 

मनपा हद्दीतील रस्त्यांची साफसफाई व स्वच्छता करण्यासाठी मनपात सध्या 1993 इतक्या सफाई कर्मचार्‍यांची पदे मंजूर आहेत. शहराचा सध्याचा विस्तार पाहता सफाई कर्मचार्‍यांची ही संख्या अत्यंत अपुरी पडत आहे. कर्मचारी नसल्याने शहरातील अनेक भागांची स्वच्छता होत नसल्याने लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून अनेक तक्रारी येत आहेत.  महासभेने मंजुरी दिल्यास प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. तत्पूर्वी मनपा पदाधिकारी व सदस्यांनी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यास विरोध करत मानधनावर कर्मचारी भरती करण्याची मागणी केली आहे. मात्र, शासनाने आउटसोर्सिंगनेच भरती करण्याबाबत आदेश दिले आहेत. यामुळे मनपा प्रशासनाने शासनाच्या निर्णयाचे पालन करत कंत्राटी पद्धतीनेच भरती करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. 

सफाई कर्मचार्‍यांच्या या भरती प्रस्तावास शिवसेनेकडून विरोध केला जाणार आहे. प्रस्तावाबाबत अभ्यास करण्याच्या दृष्टीने हा विषय तहकूब करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी सांगितले.