Wed, Jun 26, 2019 17:28होमपेज › Nashik › जळगाव मनपासाठी 53 टक्के मतदान

जळगाव मनपासाठी 53 टक्के मतदान

Published On: Aug 02 2018 2:00AM | Last Updated: Aug 02 2018 2:00AMजळगाव : प्रतिनिधी

शहरातील महापालिका निवडणुकीसाठी बुधवारी (दि.1) मतदान पार पडले. 19 प्रभागांतील नगरसेवकपदाच्या 75 जागांसाठी 469 मतदान केंद्रांवर 303 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. महापालिकेसाठी एकूण 53 टक्के मतदान झाले असून, आता जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष 3 ऑगस्टच्या निकालाकडे लागले आहे. या निकालावर अनेक मातब्बर उमेदवारांसह जिल्ह्यातील काही दिग्गज नेत्यांचे राजकीय भवितव्यही ठरणार आहे. दरम्यान, रात्री 9 वाजेपर्यंत मतदान सुरूच होते.

या निवडणुकीत खर्‍या अर्थाने गेली सुमारे 35 वर्षे नपा व मनपात सत्तेत असलेल्या माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे राजकीय भवितव्य पणाला लागलेले आहे. त्याचवेळी राज्य शासनात जलसंपदामंत्री या महत्त्वाच्या पदावर असलेल्या जिल्ह्यातील गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. विधान सभेतील माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या प्रभावाखालून बाहेर पडल्यानंतर आणि कॅबिनेट मंत्रिपद प्राप्त केल्यानंतर महाजन यांची जिल्ह्यात उघडपणे नेतृत्व करण्याची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे मनपाच्या निकालावर त्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.