Fri, Feb 22, 2019 15:50होमपेज › Nashik › 507  जवानांची तुकडी देशसेवेत

देशाच्या रक्षणासाठी जवानांनी सज्ज राहावे : सलारिया

Published On: May 25 2018 1:10AM | Last Updated: May 24 2018 11:29PMनाशिक : प्रतिनिधी 

प्रशिक्षण घेतलेल्या जवानांनी देशांच्या सीमा रक्षणासाठी नेहमी सज्ज रहावे, असे आवाहन देवळाली स्कूल ऑप आर्टिलरीचे प्रमुख जनरल रणवीरसिंग सलारिया यांनी केले. गुरुवारी (दि.24) आर्टिलरी सेंटरमधील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांच्या तुकडीचा दीक्षांत समारंभ पार पडला.

त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ऊन, पाऊस कशाचीही तमा न बाळगता 507 जवानांनी लष्कराचे खडतर प्रशिक्षण यशस्वी पूर्ण केले. या तुकडीचा लष्करात समावेश झाला असून तोपखाना विभागात ते सेवा देणार आहे. आर्टिलरी सेंटरमधील उमराव परेड मैदानवार हा दिमाखदार सोहळा पार पडला. अरविंद यादव यांच्या नेतृत्वाखाली लष्कराचा तुकडीने पथसंचलन करुन मानवंदना दिली.