Fri, Jul 03, 2020 03:12होमपेज › Nashik › जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे नवे ५० रुग्ण, एकूण आकडा ९५७ वर

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे नवे ५० रुग्ण, एकूण आकडा ९५७ वर

Last Updated: Jun 05 2020 8:30PM
जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील कोरोना रुग्णाचा आकडा कमी न होता अधिकच वाढत आहे. आज कोविड रूग्णालयास संशयित रूग्णांचा अहवाल सायंकाळी प्राप्त झाला असून नवे ५० कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांचा आकडा ९५७ वर पोहोचला आहे. आज प्राप्त अहवालानुसार रावेर तालुक्यात सर्वांधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे केळी परिसरात कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. 

जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार, जळगाव शहर १, भुसावळ ४, चोपडा ३, पाचोरा ७, यावल ६, जामनेर ३, रावेर १७, चाळीसगाव ४ तर भडगाव, धरणगाव, एरंडोल, जळगाव ग्रामीण, मुक्ताईनगर यामध्ये प्रत्येकी १ रुग्ण असे एकूण ५० कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांचा आकडा ९५७ वर पोहोचला आहे. शासनाच्या नियमांचे नागरिकांनी पालन करणे गरजेचे आहे. जरी लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असली तरी नागरिकांनी कोरोना विषाणूपासून स्वत:ची व कुटुंबियांची काळजी घेणे गरजेचे आहे. विनाकारण बाहेर फिरणे आतातरी टाळा, घरातच सुरक्षित रहा, असे जिल्हा प्रशासन वारंवार आवाहन करत आहे. आज एकूण ३६ रूग्ण आढळून आल्याचे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहर निहाय कोरोना रुग्णांची संख्या

तर जळगाव शहर २०६, भुसावळ २०९, अमळनेर १४३, चोपडा ४९, पाचोरा ३५, भडगाव ८०, धरणगाव १९, यावल ३८, एरंडोल १८, जामनेर २०, जळगाव ग्रामीण २९, रावेर ६९, पारोळा १९, चाळीसगाव १२, मुक्ताईनगर ८, दुसऱ्या जिल्ह्यातील ३ असे एकूण ९५७ कोरोना बाधितांची संख्या झाली आहे.