Tue, Jul 16, 2019 09:48होमपेज › Nashik › जळगाव : नशिराबाद येथे अपघातात ४ ठार; ३ जखमी

जळगाव : नशिराबाद येथे अपघातात ४ ठार; ३ जखमी

Published On: Aug 02 2018 11:03AM | Last Updated: Aug 02 2018 11:03AMजळगाव : प्रतिनिधी

नशिराबाद येथे मध्यरात्री दोन कारचा झालेला अपघात झाला. या अपघातात ४ जण ठार झाले असून ३ जण जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नशिराबाद येथील नॅशनल हायवे 6 वर मध्यरात्री कार क्रमांक एम एच 19 बी व्ही 8710 व कार क्रमांक एम एच 19 सि यु 6633 या गाड्यांची धडक झाली. या अपघातात समुद्र गुप्ता उर्फ चंद्रगुप्त सुरवाडे, दीपक अशोक चव्हाण, सुबोध मिलींद नरवाडे, रोहित जमदाडे हे सर्वजण ठार झाले. तर प्रिन्स मुन्नालाल अग्रवाल( सम्राट कॉलनी जळगाव),शौकत शेख (20),आयन अली मुकराज अली( सुप्रीम कॉलनी) हे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.