Thu, Jul 18, 2019 02:51होमपेज › Nashik › मनपाच्या ३७ शाळांचे होणार विलीनीकरण 

मनपाच्या ३७ शाळांचे होणार विलीनीकरण 

Published On: Apr 22 2018 1:13AM | Last Updated: Apr 21 2018 11:50PMनाशिक : प्रतिनिधी

मनपा शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी तसेच विद्यार्थ्यांना योग्य सोयी सुविधा मिळाव्यात आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मनपाच्या 126 शाळांमधील 37 शाळा अन्य शाळांमध्ये विलनीकरण करण्यात येणार आहे. यामुळे मनपाचे दहा हजाराप्रमाणे 37 लाख रुपयांच्या शाळा अनुदानाची बचत होणार असून, शंभर शिक्षक व 18 मुख्याध्यापक उपलब्ध होणार आहेत. 

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका शाळांच्या एकत्रिकरणाबाबत मनपा शिक्षण विभागाच्या केद्र प्रमुखांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करुन व संकलन करुन प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मनपाच्या सदयस्थितीत 126 प्राथमिक शाळा 82 इमारतींमधून भरतात. शाळांची विदयार्थी संख्या, कार्यरत शिक्षक, उपलब्ध वर्गखोल्या व शाळेचे सत्र याबाबत माहिती घेण्यात आली. यासंदर्भातील प्रस्ताव मनपा शिक्षण मंडळाकडून प्रशशसनाकडे सादर करण्यात आला आहे.

प्रस्तावानुसार विलनीकरण करण्यात येणार्‍या शाळांमुळे सर्व शाळांचे क्रमांक स्वतंत्रपणे नव्याने द्यावे लागणार आहे. संबंधित शाळांची वेळ एकाचवेळी भरणार्‍या शाळेसाठी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असावी आणि दुबार भरणार्‍या शाळेसाठी सकाळचे सत्र सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत तसेच  दुपार सत्रासाठी दुपारी 12.15 ते 5.15 वाजेपर्यंत वेळ असावी असे मत प्रस्तावात मंडळाने नोंदविले आहे. शाळा एकत्रिकरणामुळे आर्थिक व प्रशासकीय लाभ होणार आहे.अंंदाजित 100 ते 105 शिक्षक संख्या संच मान्यतेनुसार कमी झाल्याने सद्यस्थितीत शिक्षण विभागात रिक्त असलेली पदे भरावयाची आवश्यकता पडणार नाही. प्रती शिक्षक 500 रुपये असे अंदाजे लाख रुपयांच्या शिक्षक अनुदानाची बचत होईल.

37 शाळांच्या विलिनीकरणामुळे सरासरी दहा हजाराप्रमाणे शाळा अनुदानापोटी 37 लाख रुपयांची बचत होणार आहे. नवीन इमारत अथवा वर्ग खोल्या मिळाव्यात अशी नगरसेवकांची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. 37 शाळांच्या विलनीकरणामुळे मागणी कमी होईल. प्रती शिक्षक सरासरी 40 हजार इतके  वेतन गृहीत धरल्यास दरमहा चाळीस लाख रुपये खर्च वाचणार आहे. यात मनपाचा 20 लाख रुपये खर्च असतो. एकत्रिकरणामुळे भाडे तत्वावर घेतलेल्या केंद्र शासनाच्या तीन इमारती परत केल्यामुळे भाडे बचत होईल. नवीन कामाठी भरण्याची गरज राहणार नाही. 18 मुख्याध्यापक अतिरिक्त होतील. त्यापैकी 11 मुख्याध्यापकांचे समायोजन विलनीकरण शाळांमध्ये करून उर्वरित पाच मुख्याध्यापकांना समुपदेशनाने रिक्त पदांवर समायोजित केले जाणार आहे.

 

Tags : nashik, nashik news, Municipal School, merge,