Fri, Sep 21, 2018 07:30होमपेज › Nashik › गुळवंचला लांडग्यांच्या हल्ल्यात ३५ शेळ्या ठार

गुळवंचला लांडग्यांच्या हल्ल्यात ३५ शेळ्या ठार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सिन्‍नर : प्रतिनिधी

सिन्‍नर तालुक्यातील गुळवंच येथे सहा ते सात लांडग्यांच्या टोळक्याने गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला चढविला. त्यात 35 शेळ्या ठार झाल्या. धनराज सानप या शेतकर्‍याचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी (दि.1) पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडली. 

गुळवंच गावापासून जवळच असलेल्या बारागांव पिंप्री रस्त्यालगत भाऊसाहेब रामनाथ सानप यांच्या शेतात गोठ्यात शेळ्या बांधलेल्या होत्या. धनराज सानप यांनी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी शेळ्या खरेदी केल्या होत्या. इंडिया बुल्स कंपनीच्या सेझसाठी जमीन संपादित झाल्यानंतर उदरनिर्वाहासाठी सानप यांनी बंदिस्त शेळीपालन व्यवसाय सुरू केला होता. लांडग्यांचा हल्ला झाला तेव्हा धनराज सानप यांना पहाटे 3 वाजेच्या सुमारास शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज आला.

त्यांनी गोठ्याजवळ जाऊन डोकावले असता सहा ते सात लांडग्यांचा कळप शेळ्यांवर हल्ला करताना दिसला. त्यांनी लांडग्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र लांडग्याच्या कळपाने दाद दिली नाही. काही वेळाने लांडग्यांचा कळप गोठ्यातून बाहेर पडून पळाला. त्यानंतर धनराज यांनी ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. दरम्यान, या घटनेची मातिही मिळाल्यानंतर सिन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, वन परिमंडल अधिकारी ए .बी. साळवे, वनरक्षक एस. पी. थोरात, एम. व्ही. शिंदे, डॉ. मिलिंद भणगे, पशू वैदयकिय अधिकारी सरपंच कविता सानप, उपसरपंच भाऊसाहेब सिरसाठ, समाधान कांगणे आदी उपस्थित होते.

 

Tags : nashik, nashik news, gulvanch, wolf attack, goat,


  •