Tue, May 21, 2019 12:08होमपेज › Nashik › गावठाण भागातील कामांसाठी 322 कोटींच्या निविदेस मंजुरी 

गावठाण भागातील कामांसाठी 322 कोटींच्या निविदेस मंजुरी 

Published On: Jul 21 2018 1:32AM | Last Updated: Jul 21 2018 12:14AMनाशिक : प्रतिनिधी

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत गावठाण भागात 24 तास पाणीपुरवठ्यासह भूमिगत गटार, मोठ्या व लहान रस्त्यांच्या पुनर्विकासासाठी 322 कोटींच्या विस्तृत प्रकल्प अहवालास तसेच प्रसिद्ध केलेल्या निविदेस स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीत संचालक मंडळाने मान्यता दिली. यामुळे येत्या काळात जुने नाशिकसह गावठाण भागाचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे.  

नाशिक मनपा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संचालक मंडळाची बैठक अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत स्मार्ट सिटीअंतर्गत असलेल्या सर्व प्रकल्पांची माहिती देण्यात आली. नाशिक शहरातील मनपाच्या विविध 16 इमारतींच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्पांच्या कामासाठी ठेकेदार म्हणून 4.59 प्रतियुनिट असा दर असलेल्या मे. संगम डव्हायजर्स लि. यांच्या नियुक्तीस मान्यता देण्यात आली.

एबीडी रेट्रोफिटींग भागातील विविध कामांच्या विस्तृत प्रकल्प अहवालास तसेच निविदेस मान्यता देण्यात आली. सहा मीटरपेक्षा जास्त व सहा मीटरपेक्षा कमी रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे. 24 तास पाणीपुरवठा अंतर्गत बारा बंगला व पंचवटी येथील वॉटर ट्रीटमेंट प्लांट यांची क्षमता वाढ व दुरुस्ती तसेच संबंधित ठिकाणी दोन नवीन मास्टर बॅलन्स रिझेर्वोईर 5 ईएसआर, ई कामांचा समावेश आहे. जेणेकरून 24 तास पाणीपुरवठा करताना शहरातील उंच इमारतींनादेखील जादा दाबाने पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. गोदावरी नदी विकासासाठी सुशोभीकरण व पायाभूत घटकांचा विकास  या सुधारित विस्तृत प्रकल्प अहवालास मान्यता देण्यात आली. पंडित पलुस्कर नाट्यगृह नूतनीकरणाच्या कामासाठी दोन कोटी 33 लाखांच्या कामास मान्यता देण्यात आली. प्रसिद्ध केलेल्या एक हजार पब्लिक बायसिकल शेअरिंग कामांच्या निविदेची माहिती देण्यात आली. पं. पलुस्कर नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी दोन कोटी 33 लाखांचा निधी खर्च होणार आहे.

ज्यामध्ये डॉकिंग व डॉकलेस स्टेशन प्रस्तावित आहे.  बैठकीस संचालक रंजना भानसी, तुकाराम मुंढे, हिमगौरी आहेर, दिनकर पाटील, अजय बोरस्ते, नगरसेवक शाहू खैरे आणि नगरसेवक गुरुमित बग्गा, तुषार पगार, भास्कर मुंढे व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश विल हे उपस्थित होते.