Wed, Nov 21, 2018 13:15होमपेज › Nashik › येत्या 48 तासांत जोरदार पावसाचा अंदाज

येत्या 48 तासांत जोरदार पावसाचा अंदाज

Published On: Jun 25 2018 1:50AM | Last Updated: Jun 24 2018 11:59PMनाशिक : शहरात रविवारी (दि. 24) पावसाने रिमझिम हजेरी लावली. येवल्यातही जोरदार सरी बरसल्या. उर्वरित तालुक्यात मात्र त्याने विश्रांती घेतली. दरम्यान, जिल्ह्यात  सकाळी 8 वाजेपर्यत सरासरी 12.46 मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

जूनचा अखेरचा आठवडा सुरू झाला असला तरी जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. नाशिक शहरात रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी 2.30 वाजेच्या रिमझिम पावसाला सुरवात झाली. सुमारे अर्धा तास हा पाऊस सुरू होता. त्यानंतर सायंकाळी उशिरा पुन्हा पावसाला सुरूवात झाला.