धुळ्यात आणखी २० रुग्णांची भर

Last Updated: Jun 07 2020 11:01AM
Responsive image
संग्रहित छायाचित्र


धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे जिल्ह्यात कोरोनाचे आणखी २० बाधित रूग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत असून आतापर्यंत २३८ बाधित आढळुन आले आहेत. यात सर्वाधिक रूग्ण धुळे शहर व शिरपुर येथील आहेत. गेल्या दोन दिवसात ४३ बाधितांची वाढ झाली आहे.

धुळ्यात कोरोनाचा एक बळी

धुळे जिल्ह्यात मध्यरात्री आलेल्या अहवालात आणखी २० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्‍न आल. यात धुळे शहरातील १३, शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथील १ व शिरपुर येथील ६ बाधित आहेत. गेल्या आठवडाभरापासून धुळे शहर व शिरपुर शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळुन येत आहेत. आता जिल्ह्यात २३८ बाधित असून यातील धुळे शहरात १५१, धुळे तालुक्यात ४, शिरपुर तालुक्यात ६०, शिंदखेडा तालुक्यात १३, साक्री तालुक्यात १० बाधित असुन इतर जिल्ह्यातील १७ बाधित आढळून आले आहेत. यातील २५ जणांचा बळी गेला असून सर्वाधिक बळी धुळे शहरातील १३, धुळे ग्रामीणमधुन एक, शिरपुरमधुन ६, शिंदखेडयातुन २, साक्रीतुन ३ जण मयत झाले आहेत. तर इतर जिल्ह्यातील ३ जण मयत झाले आहेत.