Fri, Feb 22, 2019 01:25होमपेज › Nashik › कुक्कुटपालन केंद्राच्या स्थलांतराला दोन कोटी 

कुक्कुटपालन केंद्राच्या स्थलांतराला दोन कोटी 

Published On: Mar 09 2018 1:35AM | Last Updated: Mar 08 2018 11:13PMनाशिक :

त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील कुक्कुटपालन केंद्र स्थलांतरासाठी जिल्हा नियोजन मंडळाने दोन कोटी रुपये उपलब्ध करून दिले असून, जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत उभारण्याच्या मार्गातील प्रमुख अडथळा दूर झाला आहे. महिलादिनी निधी उपलब्धतेसंदर्भातील पत्र जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्याने अप्रत्यक्षरीत्या  महिला पदाधिकार्‍यांचा सन्मानच करण्यात आला आहे.

कुक्कुटपालन केंद्राच्या जागेवर प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्याआधी या केंद्राचे स्थलांतर करावे लागणार असून, त्यासाठी शेजारीच असलेल्या कृत्रिम रेतन केंद्राची जागा निश्‍चित करण्यात आली आहे. स्थलांतर करताना कुक्कुटपालन केंद्राचा सर्वच संच आता आहे तसाच दुसर्‍या जागेत नेला जाणार असून, याकामी निधीची आवश्यकता होतीच. शिवाय राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर आणि ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यात झालेल्या बैठकीच्या इतिवृत्ताचीही प्रतीक्षा होती.  इतिवृत्त प्राप्त होत नाही तोपर्यंत स्थलांतरांसाठी निधी उपलब्ध करून देण्यातही अडचण येत होती. अखेर इतिवृत्त नुसतेच प्राप्त झाले आणि जिल्हा नियोजन मंडळाने तत्काळ दोन कोटी रुपयेही उपलब्ध करून दिले आहेत.