Fri, Nov 16, 2018 08:48



होमपेज › Nashik › दहावीत ५६ टक्‍के पडल्याने विद्यार्थिनीची आत्‍महत्‍या

दहावीत ५६ टक्‍के पडल्याने विद्यार्थिनीची आत्‍महत्‍या

Published On: Jun 08 2018 7:59PM | Last Updated: Jun 08 2018 7:59PM



पंचवटी : वार्ताहर 

दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवार दि. ८ रोजी दुपारी लागला. पेठरोड फुलेनगर येथील विद्यार्थिनीने फ़क्त ५६ टक्‍के गुण मिळाले या नैराश्यातून गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शुक्रवार (दि.८) दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला होता. दहावीच्या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यात आनंदाचे वातावरण होते. दुपारी अडीच वाजता स्वामी विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थिनी साक्षी एकनाथ बॅंडकुळे (वय १६, रा. घर न. ८७७, गल्ली न. ३, फुलेनगर पोलीस चौकी पाठीमागे, पेठ रोड) येथील विद्यार्थीनीने दहावीच्या परीक्षेत पास झाली परंतु फक्त ५६ टक्‍के गुण पडले या नैराश्यातून गळफास लावून आत्महत्या केली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार आर. आर. साळवे करीत आहेत.