Thu, Aug 22, 2019 14:34होमपेज › Nashik › जॉगिंग टॅ्रकवरून १७ दुचाकी जप्त

जॉगिंग टॅ्रकवरून १७ दुचाकी जप्त

Published On: Apr 21 2019 1:41AM | Last Updated: Apr 21 2019 1:41AM
इंदिरानगर : वार्ताहर 

मनपा पूर्व विभागात इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवर अनधिकृतपणे उभ्या केलेल्या तब्बल 17 दुचाकी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने जप्त केल्या आहेत. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकसमोरील काही व्यावसायिकांची वाहने सर्रास व बेजबाबदारपणे जॉगिंग ट्रॅकवर व रस्त्याच्या दुतर्फा उभी केली जातात. याबाबत विविध संघटनांमार्फत मनपा आयुक्‍तांना निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार मनपा आयुक्त

राधाकृष्ण गमे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण 

निर्मूलन विभागाचे उपायुक्त रोहिदास बहिरम, पूर्व विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, सहाय्यक अधीक्षक एस. एल. काळे यांच्यासह पथकाने मोहीम राबविली. यात अनधिकृतपणे उभ्या केलेल्या तब्बल 17 दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.  अचानक करण्यात आलेल्या या कारवाईचे स्थानिक रहिवाशांनी स्वागत केले आहे. 
यावेळी  गुणवंत वाघ, जीवन ठाकरे, सहा विभागांचे पथक, सहा वाहने, पोलीस कर्मचारी, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे 45 कर्मचारी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला