Mon, Nov 12, 2018 23:24होमपेज › Nashik › १४ क्विंटल कांदा चोरला!

१४ क्विंटल कांदा चोरला!

Published On: Dec 17 2017 12:04AM | Last Updated: Dec 16 2017 11:57PM

बुकमार्क करा

मनमाड : वार्ताहर

चोरटे कधी काय चोरून नेतील याचा नेम नाही. सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी एका शेतकर्‍याने शेतात काढून ठेवलेला 14 क्िंवटल कांदा चोरून नेल्याची धक्कादायक घटना मनमाडपासून जवळच असलेल्या अनकाई शिवारात घडली. विशेष म्हणजे येथून पोलीस चौकी हाकेच्या अंतरावर आहे.

कष्टाने पिकवलेला कांदा चोरी गेल्यामुळे हा शेतकरी हवालदिल झाला आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकर्‍यांमध्ये चिंतावजा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खळ्यात-मळ्यात उघड्यावर ठेवलेला कांदा चोरी जाऊ नये, यासाठी जीवघेण्या थंडीत खडा पहारा देण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. या प्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस कांदाचोरांचा शोध घेत आहे. सध्या कांद्याला मिळत असलेला भाव पाहता दामले यांचे सुमारे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.