Fri, Apr 26, 2019 03:42होमपेज › Nashik › महाराष्ट्र हौसिंग फायनान्स निवडणुकीत 14 उमेदवार

महाराष्ट्र हौसिंग फायनान्स निवडणुकीत 14 उमेदवार

Published On: Jun 24 2018 1:34AM | Last Updated: Jun 23 2018 11:34PMनाशिक : प्रतिनिधी

महाराष्ट्र स्टेट को-ऑप. हौसिंग फायनान्स कॉर्पोशन लि. मुंबई या संस्थेच्या निवडणुकीत 21 जागांपैकी सात जागा बिनविरोध झाल्याने आता 14 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. गुरुवारी (दि.21) माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. 

राज्यातील एकूण सहा विभागांत ही निवडणूक होत आहे. यात नाशिक, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, पुणे, अमरावती या विभागांचा समावेश आहे. गुरुवारी माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. सर्वसाधारण गटातील 16 व राखीव गटातील पाच अशा एकूण 21 जागांसाठी ही निवडणूक होणार होती. मात्र, सर्वसाधारण गटातून पुणे विभागातील तीन आणि नाशिक विभागातील तीन व राखीव गटातील एनटी प्रवर्गातील एक अशा सात जागा बिनविरोध झाल्यामुळे आता उरलेल्या 14 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

यात राखीव गटातून सहकार पॅनलतर्फे उत्तर महाराष्ट्र गृहनिर्माण संस्थांच्या महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. वसंत तोरवणे, महिला राखीव मधून धुळ्याच्या संजीवनी सिसोदे, मुंबईच्या स्नेहा अंबरे, एससी-एसटी प्रवर्गातून नांदेडच्या निशा सोनवणे हे उमेदवार रिंगणात आहेत. मतदान रविवार, दि. 1 जुलै रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयात पार पडणार आहे. मतदानावेळी मतदारांनी मतदान ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे.