Sat, Jul 20, 2019 15:05होमपेज › Nashik › जीप-ट्रक अपघातात १० जखमी

जीप-ट्रक अपघातात १० जखमी

Published On: Feb 19 2018 1:21AM | Last Updated: Feb 19 2018 12:16AMपारोळा : प्रतिनिधी

काळी-पिवळी सवारी प्रवासी वाहतूक जीपला आयशरने धडक दिल्याने 10 जण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.18) सकाळी 11 वाजता महामार्गावरील करंजी गावानजीकच्या हॉटेल रॉयलसमोर घडली. पारोळा येथून प्रवासी वाहतूक करणारी सवारी महिंद्रा जीप (क्र. एमएच-39-7147) धुळ्याकडे जात असतांना महामार्गावरील विचखेडा- करंजीदरम्यान समोरून येणार्‍या आयशरने धडक दिल्याने जीप रस्त्याच्या कडेला उलटली.

या घटनेत जीपमधील सुरेश मांगो बडगुजर (70), शकुंतलाबाई सुरेश बडगुजर (60,  दोघे रा. विचखेडा, ता. पारोळा, ह. मु. धुळे), सदाशिव विश्‍वास भामरे (35, रा. अनचाळे, ता. जि. धुळे), नाना ताराचंद सोनवणे (40), बनिता नाना सोनवणे (35, दोघे रा. कुंडाने, ता. जि. धुळे) या जखमींना पारोळा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर बाकी पाच जखमी घटनास्थळावरून धुळ्याकडे निघून गेले. पारोळा येथील जखमींवर डॉ. योगेश साळुंखे, डॉ. सुनील पारोचे, डॉ. राहुल जैन, परिचारिका काथार, दिपक सोनार, योगेश मरसाळे, प्रसाद राजहंस आदींना प्रथमोपचार करून धुळे येथे हलविले. नाना सोनवणे यांच्या फिर्यादीवरून  आयशर चालकावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.