Sun, Feb 23, 2020 16:06होमपेज › Nashik › सराईत गुन्हेगार अशोक तरकसेला अटक

जालन्यात सराईत गुन्हेगार जेरबंद

Published On: Aug 19 2019 5:37PM | Last Updated: Aug 19 2019 5:37PM

संग्रहित छायाचित्रजालना: पुढारी ऑनलाईन

जालन्यातील सराईत गुन्हेगार अशोक भिकाजी तरकसेला चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले आहे. जामवाडी पेट्रोल पंपावर थांबल्याची माहिती मिळाल्यावर पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांच्या पथकाने तातडीने सापळा रचून तरकसेच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्याच्याकडून ५ दुचाकी वाहने व एक महागडा कॅमेरा असा १ लाख ५७ हजारांचा ऐवज जप्त केला. 

अशोक तरकसेच्या चौकशी दरम्यान त्याने ताब्यातील दुचाकी गुराच्या बाजारातून चोरल्याची कबुली दिली. तसेच त्याने जालना शहराच्या विविध भागातून चार दुचाकी वाहने चोरल्याचे आणि मंठा शहरातील एक मिठाईचे दुकान व फोटो स्टुडिओ फोडल्याचीही कबुली दिली. यानंतर त्याच्या ताब्यातून ५ दुचाकी वाहने व एक महागडा कॅमेरा, असा १ लाख ५७ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

यामध्ये पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलिस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, सहा. फौजदार एम.बी. स्कॉट, रामप्रसाद रंगे, संदीप चिंचोले, राजू पवार यांनी कामगिरी केली.