Mon, Mar 25, 2019 13:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबईतील जिपच्या 10 शाळा यंदापासून बंद

नवी मुंबईतील जिपच्या 10 शाळा यंदापासून बंद

Published On: May 02 2018 1:18AM | Last Updated: May 02 2018 12:42AMनवी मुंबई : पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जागा देण्यास प्रकल्पग्रस्तांकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे नाराज झालेल्या राज्य सरकारने परिसरातील जिल्हापरिषदेच्या 10 शाळा मे महिन्यापर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे परिसरातील प्रकल्पग्रस्तांना पुष्पक नोडमध्ये स्थलांतर करणे भाग पडणार आहे. जेथे प्रकल्पग्रस्तांच्या मुलांसाठी दोन नव्या शाळा बांधण्यात आल्या आहेत.

आतापर्यंत 10 गावांतील 3 हजार प्रकल्पग्रस्तांपैकी  अवघ्या 40 टक्के लोकांनी पुष्पक आणि उलवे नोडमध्ये स्थलांतर केले आहे. ज्यात विकसित केलेले भूखंड, दोन शाळा आणि इतर सोयीसुविधांचा समावेश आहे. हे नोड्स प्रकल्पामुळे बाधित होणार्‍या पाच गावांपासून खूप दूर अंतरावर आहेत. प्रकल्पबाधित 10 गावांत जिल्हा परिषदेची प्रत्येकी एक शाळा आहे. या शाळांत शिकणार्‍या विद्यार्थ्यांचे 2017 हे शाळेतील शेवटचे शैक्षणिक वर्ष असेल. यासंबंधीचे पत्र मार्चमध्ये ग्रामीण विकास सचिवांनी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना लिहिले आहे. बंद होणार्‍या या शाळांत 1 हजार मुले शिक्षण घेत आहेत. 

या वृत्ताला सिडकोचे प्रवक्ते मोहन निनावे यांनीही दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, शाळा बंद होतील आणि त्यामुळे मुलांना नव्या शाळेत प्रवेश घेणे सोयीचे होईल. जिल्हा परिषदेच्या समितीनेही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.