Fri, Apr 26, 2019 17:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई विद्यापीठ सिनेट; अभाविपचा धुरळा, युवा सेनेचे निर्विवाद वर्चस्व

मुंबई विद्यापीठ सिनेट; युवा सेनेचा विजयी जल्‍लोष(Video)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत दहा पैकी आठ जागांवर विजय मिळवत युवा सेनेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला चारी मुंड्या चीत केल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व दहा जागांवर युवा सेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. निकालानंतर दादर येते सेना भवनात युवा सेना आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या निवडणुकीत शिवसेना आमच्या पाठिशी होती, असे मत युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 

सिनेट निवडणुकीत अभाविपचा दारूण पराभव झाला असून, दहा पैकी शिल्लक राहिलेल्या दोन जागांवरही युवा सेनेचेच उमेदवार आघाडीवर असल्यामुळे तेथेही युवा सेनाच विजय ठरेल, असे स्पष्ट होत आहे. निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही उतरली होती. मात्र, अभाविपप्रमाणेच त्यांनाही मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले होते. तर मतमोजणी बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. प्रदीप सावंत, महादेव जगताप, सुप्रिया कारंडे, राजन कोळंबेकर, शीतल शेठ-देवरुखकर, निखील जाधव, धनराज कोहचाडे, शशिकांत झोरे, प्रवीण पाटकर, मिलिंद साटम यांनी निवडणुकीत विजय मिळविला आहे. गेल्या निवडणुकीत दहा पैकी आठ जागा युवा सेनेकडे होत्या मात्र, यंदा सर्वच जागांवर युवा सेनेने बाजी मारली आहे. 

विजयानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, 'या विजयाचे श्रेय शिवसेना आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना आहे. गेल्या आठ वर्षांत आमच्या सदस्यांनी केलेल्या कामाचे हे यश आहे. आमच्या मागे पक्ष होता म्हणूनच हे निर्विवाद यश मिळाले.' आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र दिसेल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. 

Tags : yuva sena, Shivsena, mumbai, mumbai news, mumbai university, mumbai university news, mumbai university senate elections, aaditya thackeray


  •