Tue, Feb 19, 2019 22:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › निवडणूक लढविण्याचे वय कमी करा

निवडणूक लढविण्याचे वय कमी करा

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 24 2017 1:34AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

लोकशाही व्यवस्थेत वयाच्या 18व्या वर्षी मतदानाचा अधिकार दिला गेला आहे. तर निवडणूक लढविण्यासाठी वयोमर्यादेची अट कशासाठी, असा प्रश्‍न युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केला असून निवडणूक लढविण्यास असलेली वयोमर्यादा कमी करण्याची मागणी केली आहे.

लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींची निवड करण्याचा अधिकार वयाच्या 18व्या वर्षी देण्यात आला आहे. मात्र या निवडणुका लढण्यासाठी किमान 25 वर्षे वय असणे आवश्यक आहे. जर एखाद्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिला असेल तर  ती व्यक्ती निवडणूक लढण्यास का पात्र ठरत नाही, सध्या निवडणूक लढविण्यास असलेली वयोमर्यादा कमी करून ती 18 किंवा 21 वर्षे करण्यात यावी, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ट्विटरद्वारे या विषयाकडे त्यांनी युवा मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.