Sat, Jul 20, 2019 08:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रेयसीला भेटण्यासाठी तरुणाचे हायकोर्टाला साकडे

प्रेयसीला भेटण्यासाठी तरुणाचे हायकोर्टाला साकडे

Published On: Apr 10 2018 1:21AM | Last Updated: Apr 10 2018 1:18AMमुंबई : प्रतिनिधी

माझे त्या मुलीवर प्रेम आहे. आम्ही लग्न करणार आहोत; परंतु मुलीच्या घरातून  विरोध  असल्याने भेट होत नाही. पोलीसही दखल घेत नाहीत, असा आरोप करून दिव्यांग प्रियकराने थेट मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. मला माझ्या पे्रयसीला भेटू द्या, अशी विनवणी करणारी याचिकाच उच्च न्यायालयात दाखल केली आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाने संबधित पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍याला पुढील सुनावणीला  हजर करण्याचे निर्देश सरकारी वकिलांना दिले.

याचिकाकर्त्याचे एका 22 वर्षाच्या मुलीवर प्रेम जडले. दिवसेंदिवस प्रेमाचा अंकूर वाढत गेला. दोघांनीही लग्नाच्या बेडीत अडकण्याच्या निर्णय घेतला. दोन्ही घरच्या मंडळीणी परस्परांच्या घरात जाऊन लग्नाची बोलणीही केली. परंतु मुलीने निवडलेला जोडीदार हा दिव्यांग असल्याचे समजताच मुलीच्या घरातून लग्नाला जोरदार विरोध झाला. मुलीने कुटुंबीयांच्या विरोधानंतरही लग्न करण्याचा निर्धार बोलून दाखवताच तिला मारहाण करण्यात आली़  तसेच आपल्यावरही हल्ला करण्यात आला. पोलिसांनी आपली तक्रार घेण्यास नकार दिला, अशी कैफियत घेऊन या या मुलाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मला पे्रयसीची भेट घालून द्या, अशी विनंती न्यायालयाला केली.  या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने या याचिकेची गंभर दखल घेऊन  पोलिसांनी या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेतली, कोणती पावले उचलली हे जाणून घेण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकार्‍याला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश अतिरिक्त सरकारी वकील अजय पाटील यांना दिले.

Tags : Mumbai, Mumbai news, youth, meet, lover, Mumbai High Court,