Tue, Mar 19, 2019 03:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विरारमध्ये युवकाची हत्या, अनोळखी इसमांकडे मोबाईल मागणे पडले महागात

अनोळखी इसमांकडे मोबाईल मागणे पडले महागात

Published On: Jan 11 2018 1:31AM | Last Updated: Jan 11 2018 1:31AM

बुकमार्क करा
विरार : वार्ताहर

बायकोला फोन लावण्यासाठी अनोळखी इसमांकडे मोबाईलची मागणी करणार्‍या कमलेशकुमार केवट(33) या युवकाची तिघांकडून हत्या करण्यात आली. विरार पश्चिम यशवंतनगर येथे ही घटना घडली.  याबाबत विरार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक वृत्त असे, 15 दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशमधून विरारमध्ये आलेला कमलेशकुमार केवट (33) हा विरार पश्चिमेकडील यशवंतनगर येथील अंबिका स्वीट्स फरसाण या मिठाईच्या दुकानात कारागीर म्हणून काम करत होता. सोमवारी रात्री 10.30 च्या सुमारास कमलेशकुमारला त्याच्या बायकोला फोन करायचा होता. मात्र त्याच्या मोबाईलमध्ये बॅलन्स नसल्यामुळे त्याने दुकानाच्या समोरील खुल्या मैदानात असलेल्या तीन अज्ञात इसमांकडे अर्जन्ट फोन करायचा आहे त्यासाठी मला तुमचा मोबाईल वापरायला द्या, अशी मागणी केली. मात्र मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तिघांनी कमलेशकुमारजवळील मोबाईल खेचून घेतला व दादागिरी करून वाद घालू लागले. यावेळी खुल्या काळोखी मैदानाचा फायदा घेऊन कमलेशकुमारवर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले. यातच कमलेशकुमारचा मृत्यू झाला. पोलिसांना घटनास्थळावर मिळालेल्या मोबाईलवरून दोघांचा शोध घेण्यात आला. हे यशवंतनगर परिसरातील असून  दोघे सख्खे भाऊ असल्याचे समजते तर एकजण फरार आहे. फरार आरोपीही लवकरात लवकर जेरबंद करू, असे सांगून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.