Wed, Jan 23, 2019 04:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वडिलांना चिडवल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणाची विक्रोळीत हत्या

वडिलांना चिडवल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणाची विक्रोळीत हत्या

Published On: Jul 06 2018 1:33AM | Last Updated: Jul 06 2018 12:44AMमुंबई : प्रतिनिधी

वडिलांना चिडवल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणाला पाच जणांनी केलेल्या जबर मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री विक्रोळीच्या टागोरनगर  एक मध्ये घडली. जयेश  राठोड(29) असे मृत तरुणाचे नाव असून तो फणसळकर चाळ येथे आपल्या परिवारासह राहत होता. 

जयेशच्या वडिलांची उंची सहा फुटांपेक्षा जास्त आहे. म्हणून त्यांना या विभागातील टवाळखोर मुले ‘लंबू’ म्हणून चिडवत असत. परंतु याचा राग जयेशला आणि त्याच्या वडिलांना येत असे. बुधवारी देखील अशाच प्रकारे त्यांना चिडवले असता त्यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात याची तक्रारहीकेली होती. जयेशला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्याने विभागातील या चिडवणार्‍या तरुणांना जाब विचारण्याच्या प्रयत्न केला असता त्यालाच ठार मारण्यात आले. 

विक्रोळी पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या. कलम 302 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.  अगदी शुल्लक कारणावरून झालेल्या हाणामारीत जयेशचा जीव गेल्याने या घटनेमुळे विभागात शोककळा पसरली आहे.