Tue, Jul 16, 2019 13:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›  संभाजी भिडेंच्या अटकेसाठी मंत्रालयासमोर आत्‍मदहनाचा प्रयत्‍न 

 संभाजी भिडेंच्या अटकेसाठी मंत्रालयासमोर आत्‍मदहनाचा प्रयत्‍न 

Published On: May 02 2018 3:30PM | Last Updated: May 02 2018 3:30PMमुंबई : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणातील आरोपी संभाजी भिडे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी बुधवारी मंत्रालयासमोर रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्याने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. गणेश पवार (रा. राहुरी जि. अहमदनगर) असे आत्‍मदहनाचा प्रयत्‍न कणाऱ्या कार्यकर्त्याचे नाव असून, त्‍याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी करत गणेशने मंत्रालयासमोर आला. त्याने मंत्रालयाच्या गेटजवळ अंगावर रॉकेल ओतून घेतले. हा प्रकार त्‍या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी पाहिला आणि त्यांनी तातडीने गणेशच्या दिशेने धाव घेत त्याला रोखले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.