Sun, Jul 21, 2019 07:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दुचाकी अपघातात तरुण जागीच ठार

दुचाकी अपघातात तरुण जागीच ठार

Published On: Feb 12 2018 2:18AM | Last Updated: Feb 12 2018 1:28AMभिवंडी : वार्ताहर

भिवंडीतील जुन्या नाशिक मार्गावरील मिल्लतनगरमधील अबूजी कॉम्प्लेक्ससमोर भरधाव दुचाकी स्पीड ब्रेकरवरून घसरल्याने झालेल्या अपघातात तरुण जागीच ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना रविवारी घडली. असहाब निसार अहमद अन्सारी (19) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अब्दुल्लाह शमशाद खान (18) हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे दोघेही भिवंडीतील अवचितपाडा परिसरात राहणारे आहेत. 

रविवारी सकाळी अकराच्या सुमाराला अब्दुल्लाह हा मित्र असहाब याला दुचाकीवरून बसवून शानदार मार्केटकडून वंजारपट्टी नाका येथे जात होता. त्याच सुमाराला अबूजी काम्प्लेक्ससमोर असलेल्या स्पीड ब्रेकरवरून भरधाव दुचाकी उडाल्याने दोघेही दुभाजकावर आदळून  विरुद्ध दिशेने जाणार्‍या रस्त्यावर पडले. त्याच सुमाराला एक भरधाव ट्रक त्यांच्या अंगावरून गेला. या अपघातात पाठीमागे बसलेला असहाब याचा जागीच ठार तर दुचाकी चालवणारा अब्दुलाह हा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतक असहाब याचा मृतदेह इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला.अपघाताची नोंद निजामपूर पोलीस ठाण्यात झाली असून तपास पोउनि दिलीप भंडे करत आहेत.