Wed, Jan 22, 2020 14:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात इमारतीच्या ५ व्या मजल्‍यावरून तरूणीचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न (video)

पाचव्या मजल्‍यावरून तरूणीचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न (video)

Published On: Jul 23 2019 10:58AM | Last Updated: Jul 23 2019 11:52AM
ठाणे : प्रतिनिधी 

ठण्यातील पोलिस शाळेजवळील इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्‍न एक तरुणीने केला. यावेळी पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटनास्थळी वेळेत पोचल्याने पुढचा अनर्थ टळला. 

ठाणे ग्रामीण पोलिस मुख्यालयाजवळील पोलिस स्कूल जवळ भास्कर अपार्टमेंट आहे. ही 13 मजली इमारत आहे. या इमारतीच्या 5 व्या मजल्यावरून या तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या तरूणीने  स्वतः च्या हाताला आणि पोटावर ब्लेडने वार केले आहेत. पोलिस आणि आपत्‍ती व्यवस्‍थापनाच्या टीमने या मुलीला आत्‍महत्‍या करण्यापासून वाचवले.

 ही तरुणी कोण आहे आणि या ठिकाणी कशी पोहोचली तिने आत्‍महत्‍येचा निर्णय का घेतला याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. या गोष्‍टीचा पोलिस तपास करत आहेत.