Mon, Apr 22, 2019 04:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › इमारतीच्या अकराव्या मजल्‍यावरून पडून युवतीचा मृत्यू

इमारतीच्या अकराव्या मजल्‍यावरून पडून युवतीचा मृत्यू

Published On: Aug 21 2018 10:07PM | Last Updated: Aug 21 2018 10:06PMपनवेल :  विक्रम बाबर 

इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून पडून एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कामोठे सेक्टर ३६ मध्ये घडली. ही १९ वर्षीय मुलगी काही कामानिमित्ताने घराच्या बाल्कनीत आली. त्याचवेळी तोल जाऊन ती खाली पडल्याचे सांगितले जात आहे.

प्रीती गरड असे या तरुणीचे नाव आहे. प्रीती कामोठे सेक्टर ३६ मधील अंबे श्रद्धा या सोसायटीत राहत होती. आज संध्याकाळी पाच वाजता आपल्या घराच्या बाल्कनीत काही कामानिमित्ताने ती उभी होती. या वेळी तिचा तोल गेला आणि ती अकराव्या मजल्यावरून तोल जाऊ खाली पडली. अकराव्या मजल्यावरून गार्डन परिसरात पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. यावेळी प्रीती घरात एकटीच असल्याचे कामोठे पोलिसाचे म्हणणे आहे. प्रीती केएलई महाविद्यालयात एफवायबीकॉमच्या दुसऱ्या वर्गात शिकत होती. या प्रकरणी कामोठे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन तपास सुरू केला आहे. प्रीतीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कामोठे परिसरात हळहळ व्यक्त होतेय.