Mon, Sep 24, 2018 19:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कामगार नेते शाम म्हात्रे यांचे निधन

कामगार नेते शाम म्हात्रे यांचे निधन

Published On: Jun 09 2018 9:37AM | Last Updated: Jun 09 2018 9:37AMपनवेल : प्रतिनिधी (विक्रम बाबर)  

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तसेच आगरी समाजाचे आधारस्तंभ जेष्ठ कामगार नेते  शाम म्हात्रे यांचे आज ९ जून रोजी सकाळी ६ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. शाम म्हात्रे यांच्यावर दादर येथील धनवतरी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या मागे दोन मुली आणि पत्नी असा त्यांचा परिवार आहे.

त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक ९ जून रोजी दुपारी २ वाजता खांदा कॉलोनी येथील राहत्या घरातून निघणार आहे.