Fri, Feb 22, 2019 10:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कामाच्या ताणातून देवनारच्या पोलीस हवालदाराचा मृत्यू

कामाच्या ताणातून देवनारच्या पोलीस हवालदाराचा मृत्यू

Published On: Jan 09 2018 2:02AM | Last Updated: Jan 09 2018 1:54AM

बुकमार्क करा
गोवंडी : वार्ताहर

गेल्या आठ दिवसात मुंबई पोलिसांवर आणि खास करून पूर्व उपनगरातील पोलिसांवर असलेला प्रचंड कामाचा ताण एका पोलीस हवालदाराच्या जीवावर बेतला आहे. सतत कामाच्या ताणावातून देवनार पोलीस ठाण्याचे 57 वर्षीय पोलीस हवालदार रघु तुकाराम सहाणे यांचा ब्रेन हॅमरेज होऊन सोमवारी पहाटे सहा वाजताच्या दरम्यान सायनच्या टिळक रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सहाणे हे 31 डिसेंबरपासून सतत कर्तव्यावर होते. त्यातच गोवंडी, चेंबूर भागात बंदमुळे त्यांच्यावर कामाचा मोठा ताण होता. रविवारी चेंबूरच्या पांजरपोळ येथे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचे उद्घाटन आणि उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. सभेचा बंदोबस्त संपवून सहाणे दमलेल्या अवस्थेत घरी परतत असताना रात्री 9 वाजताच्या दरम्यान त्यांची तब्येत बिघडली. त्यांना सायनच्या  टिळक रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. सिटी स्कॅन केल्यावर त्यांचा ब्रेन हॅमरेज झाल्याचे समोर आले. त्यांच्यावर  उपचार सुरु असतानाच त्यांचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. मूळचे जुन्नर तालुक्याचे रहिवासी असलेले रघु सहाणे गोवंडीच्या गौतमनगरमध्ये राहायचे.

14 एप्रिल 1986 साली ते पोलीस खात्यात भरती झाले होते. 31 ऑगस्ट 2018 रोजी ते पोलीस खात्यातून निवृत्त होणार होते. परंतु त्याच आधी त्यांचा प्रकारे मृत्यू झाल्याने हळहळ  व्यक्त होत आहे.