Mon, Sep 24, 2018 07:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीत महिला पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या 

डोंबिवलीत महिला पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या 

Published On: Mar 21 2018 1:40AM | Last Updated: Mar 21 2018 1:30AMडोंबिवली :

घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या अश्विनी गीते यांनी कल्याण पूर्वेतील मलंगरोड परिसरातील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना सोमवारी मध्यरात्री 2 वाजता उघडकीस आली. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या कॉन्स्टेबलने आत्महत्येचा मार्ग का पत्करला, याची अद्याप उकल झाली नसून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.