Tue, Apr 23, 2019 19:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खारघर : ग्रामस्थामुळे अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा डाव उधळला

खारघर : ग्रामस्थामुळे अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा डाव उधळला

Published On: May 16 2018 7:37PM | Last Updated: May 16 2018 7:37PMपनवेल : प्रतिनिधी           

खारघर येथील ५ वर्षीय मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने अपहरण करणाऱ्या महिलेचा डाव गावातील चाणक्ष्य ग्रामस्थांनी हाणून पाडला. अपहरण करणाऱ्या या महिलेस पकडून ग्रामस्थांनी खारघर पोलिसांच्या ताब्यात दिले. खारघर गावातील कुणाल पाटील यांच्या सतर्कते मुळे हा सर्व प्रकार समोर आला. या घटनेमुळे खारघर परिसरात भितीचे वातावरण पसरले. 

सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक अज्ञात महिला खारघर गावातील एका ५ वर्षीय मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने अपहरण करण्याच्या प्रयत्नात होती.  याचवेळी गावातील तरुण कुणाल पाटील यास ही मुलगी आपल्याच गावातील असल्याचे लक्षात आले. मात्र तिच्या सोबत असणारी ही महिला गावातील नसल्याने तिच्या वागण्यात संशय आला. यावेळी ग्रामस्थानी या महिलेस थांबवून तीला तीचे नाव, पत्ता व या मुलीला संबंधीची विचारपूस केली. यावेळी या महिलेने ग्रामस्थांच्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे दिली. 

या महिलेच्या वागण्या-बोलण्यातून ती नशा करत असल्याचे ग्रामस्थांच्या निर्देशनास आले. त्यावेळी तीची बॅग तपासली असता त्यामध्ये कैची व रुमालाला रासायनिक द्रव्ये लावले असल्याचे आढळून आणले. त्यानुसार सदर महिला मुलांचे अपहरण करणारी असल्याची ग्रामस्थांची खात्री झाली. यावेळी ग्रामस्थांनी मिळून तिच्या जवळ असलेल्या त्या मुलीला सोडवून त्या महिलेस पकडून खारघर पोलिसांच्या ताब्यात दिले.