Sat, Jul 20, 2019 23:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘तीन तलाक’साठी भिवंडीत हजारो महिला रस्त्यावर

‘तीन तलाक’साठी भिवंडीत हजारो महिला रस्त्यावर

Published On: Mar 08 2018 1:48AM | Last Updated: Mar 08 2018 1:03AMभिवंडी : वार्ताहर 

देशातील मुस्लिम महिलांच्या आत्मसंरक्षणासाठी नरेंद्र मोदी सरकारने ट्रिपल तलाक या संकल्पनेस मूठमाती देत अशा पद्धतीने तलाक देणार्‍या विरोधात महिलेने तक्रार केल्यास पतीस तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद करणारा कायदा केला आहे. या निर्णयाचे संपूर्ण देशभरातील मुस्लिमांकडून स्वागत होत असताना भिवंडी शहरात ट्रिपल तलाकच्या समर्थनार्थ तंजीम उलमा-ए-अहले सुन्नत या संघटनेच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयावर बुधवारी विशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. 

भिवंडीत 136 मस्जिदींमधील मौलवींच्या तंजीम उलमा-ए-अहले सुन्नत या संघटनेच्या मौलाना युसूफ रजा यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मुस्लिम महिलांना एकत्रित करून या कायद्याविरोधात मूक मोर्चा काढण्यात आला. कोटर गेट मस्जिद ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या मोर्चात शहरातील महिला एकत्रित झाल्या होत्या. यावेळी युसूफ रजा यांच्यासह मुफ्ती ताहीर, मुफ्ती मुदशीर, मौलाना समशेर, मौलाना समशेद महिला प्रतिनिधी फातिमा सुरय्या, रेहाना अन्सारी यांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी डॉ. संतोष थिटे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.