Thu, Jul 18, 2019 16:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उंचसखल रस्त्याने घेतला महिलेचा बळी, घटना सीसीटीव्हीत कैद 

उंचसखल रस्त्याने घेतला महिलेचा बळी, घटना सीसीटीव्हीत कैद 

Published On: Jul 07 2018 8:52PM | Last Updated: Jul 07 2018 8:51PMकल्याण : वार्ताहर

महिनाभरपूर्वी शिवाजी चौक परिसरात उंचसखल रस्त्यामुळे दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात एका आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला महिना उलटत नाही तोच पुन्हा एकदा याच रस्त्यावर त्याच ठिकाणी  दुचाकीचा तोल गेल्याने  महिला बस खाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. शहरात सुरू असलेल्या रस्त्याच्या काँक्रीटीकरण दरम्यान रस्त्यांच्या बाजूला पेव्हर ब्लॉक बसवन्यात आले आहेत मात्र, यामध्ये लेव्हलिंग न करण्यात आल्याने रस्ते वरखाली झाले आहेत. नागरिकांच्या जीवावर उठलेल्या आशा रस्त्यांचा प्रश्न एैरणीवर आला आहे.

कल्याण डोंबिवली शहरात रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून या रस्त्यांच्या दुरतफा पेव्हर ब्लॉक बसवलं जात आहेत. हे पेव्हर ब्लॉक नियोजनहीन पद्धतीने बसवन्यात आले असून, त्यामुळे रस्त्याची पातळी एकसमान दिसून येत नाही. आशा नियोजणहीन रस्तावरून दुचाकी चालवताना अनकेदा तोल जाऊन दुचाकींचे अपघात घडत आहे. शिवाजी चौकात महिनाभरापूर्वी दुचाकी  घसरून झालेल्या अपघातात आई वडिलांबरोबर दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या आरोह नावाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आज संध्याकाळी चारच्या सुमारास  मनीषा भोईर ही महिला एका तिच्या नातेवाईकासह दुचाकीने शाळेतून घराच्या दिशेने  शिवाजी चौकातून जात असताना केम्ब्रिज दुकानासमोरील उंचसखल रस्त्यामुळे दुचाकी घसरली व पाठीमागे बसलेल्या मनीषा भोईर बाजूने जाणाऱ्या बसच्या चाकाखाली आल्या. या अपघातात जखमी झालेल्या भोईर यांना  तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र, तिचा मृत्यू झाला. ही घटना एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.